पीएम्इंडिया
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या प्रेरणादायी संबोधनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रपतींनी भारताच्या संविधानाचे वेगळेपण अतिशय समर्पकपणे अधोरेखित केले आहे आणि देशाला पुढे नेणाऱ्या सामूहिक भावनेची प्रशंसा केली आहे. त्यांचे हे संबोधन प्रत्येक नागरिकाला लोकशाही बळकट करण्यासाठी, घटनात्मक आदर्शांचे पालन करण्यासाठी आणि ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी आपली वचनबद्धता पुन्हा दृढ करण्यास प्रोत्साहित करते, असेही त्यांनी नमूद केले.
‘X’ या समाजमाध्यमावर पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी अतिशय प्रेरणादायी संबोधन केले. त्यांनी आपल्या संविधानाचे वेगळेपण योग्यरित्या अधोरेखित केले असून आपल्या राष्ट्राला पुढे नेणाऱ्या सामूहिक भावनेचे कौतुक केले आहे. त्यांचे हे भाषण प्रत्येक नागरिकाला लोकशाही बळकट करण्यासाठी, घटनात्मक आदर्शांचे पालन करण्यासाठी आणि ‘विकसित भारत’ घडवण्याच्या दिशेने आपला संकल्प पुन्हा दृढ करण्याची प्रेरणा देते.”
On the eve of Republic Day, Rashtrapati Ji gave a very inspiring address. She has correctly emphasised the uniqueness of our Constitution and appreciated the collective spirit that has taken our nation forward. Her address motivates every citizen to reaffirm their commitment to… https://t.co/eZkhkOZHdk
— Narendra Modi (@narendramodi) January 25, 2026
गणतंत्र दिवस की पूर्व संध्या पर राष्ट्रपति जी ने देश के नाम एक अत्यंत प्रेरणादायी संबोधन दिया है। उन्होंने हमारे संविधान की विशेषता को रेखांकित करते हुए उस सामूहिक भावना की सराहना की, जिसने हमारे राष्ट्र को निरंतर आगे बढ़ाया है। उनका यह संबोधन हर देशवासी को लोकतंत्र को सशक्त… https://t.co/eZkhkOZHdk
— Narendra Modi (@narendramodi) January 25, 2026
***
शैलेश पाटील/आशुतोष सावे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com