नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत, प्रधानमंत्री विकसित ग्राम स्वराज्य योजना (PM VGSY) या केंद्र सरकार पुरस्कृत योजनेला मंजूरी देण्यात आली. विकसित भारताच्या दूरदृष्टीशी संबंधित असा हा प्रशासनात अत्याधुनिक परिवर्तन घडवणारा उपक्रम असेल. वर्ष 2026-27 ते 2030-31 या काळासाठी म्हणजे, सोळाव्या वित्त आयोगाच्या कालावधीशी संलग्न काळात या योजनेची अंमलबजावणी करण्यासही मंजूरी देण्यात आली आहे.
वित्तीय परिणाम:
या योजनेसाठी 7,395.55 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यातला केंद्र सरकारचा वाटा 4,869.48 कोटी इतका आणि राज्य सरकारांचा वाटा 2,526.07 कोटी इतका असेल.
लाभार्थ्यांची संख्या:
देशभरातील 2.55 लाख ग्रामपंचायती आणि पारंपरिक स्थानिक स्वराज्य संस्था यातील सुमारे 32 लाख निर्वाचित लोकप्रतिनिधी, तसेच पंचायत समित्यांचे पदाधिकारी आणि इतर भागधारक यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. प्रत्येक जनजागृती कार्यक्रम, किमान एक कोटी नागरिकांपर्यन्त पोहोचणे अपेक्षित आहे.
रोजगारनिर्मितीच्या संधी आणि इतर महत्वाचे प्रभाव:
या योजनेअंतर्गत कोणत्याही कायमस्वरूपी पदांची निर्मिती केली जाणार नाही. मात्र, जशी गरज लागेल, तशा स्वरूपात, संस्थात्मक यंत्रणेला तांत्रिक सहकार्य मिळवून, योजनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्य, जिल्हा किंवा तालुका पातळीवर कंत्राटी स्वरूपात, मनुष्यबळ घेतले जाईल.
राज्ये/जिल्हे समाविष्ट:
ही योजना देशातील सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात राबवली जाईल. यात, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नवव्या क्षेत्रातील भाग नसलेल्या, ग्रामपंचायती नसलेल्या भागातही लागू केली जाईल.
सविस्तर माहिती:
अंमलबजावणी धोरण:
ही योजना संबंधित राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांच्या माध्यमातून राबवली जाईल. राज्ये/केंद्रशासित प्रदेश योजनेची उद्दिष्टे आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विविध उपक्रम, प्राधान्यक्रम आणि गरजांचा तपशील देणारे ‘वार्षिक कृती आराखडे सादर करतील. केंद्रीय अधिकारप्राप्त समिती विहित कार्यपद्धती आणि मानकांनुसार या आराखड्यांचे मूल्यमापन करून त्यांना मंजुरी देईल. केंद्र सरकार आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश आपापल्या जबाबदारीच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबवतील; ज्यामध्ये समन्वय, तांत्रिक सहाय्य, देखरेख आणि पुनरावलोकन यांचा समावेश असेल. तळागाळातील स्तरावर अंमलबजावणीसाठी विद्यमान संस्थात्मक, क्षमता-बांधणी, डिजिटल आणि दळणवळण प्रणालींची मदत घेतली जाईल.
* * *
निलिमा चितळे/राधिका अघोर/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai