Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक


नवी दिल्ली, 26 एप्रिल 2026

प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. भारताच्या विविधतेचे आणि जिवंतपणाचे आपल्या कॅमेऱ्यातून अमर चित्रण करणारे ते एक सर्जनशील कलावंत होते, असे पंतप्रधान म्हणाले. रघू राय यांच्या छायाचित्रांमध्ये विलक्षण संवेदनशीलता, सखोलता आणि विविधता दिसून येत होती. त्यांनी भारतातील जीवनाचे अनेक पैलू आपल्या कॅमेऱ्यात टिपत  लोकांच्या  जवळ आणले, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

छायाचित्रण आणि संस्कृतीच्या जगातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांचे निधन हे कलाविश्वासाठी कधीही भरून न येणारी हानी  आहे, अशा शब्दात त्यांनी शोक व्यक्त केला.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे;

“रघू रायजी हे भारताच्या जिवंतपणाचे आपल्या कॅमेऱ्यातून चित्रण करणारे सर्जनशील कलावंत म्हणून सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या छायाचित्रांमध्ये विलक्षण संवेदनशीलता, गहनता आणि विविधता होती. त्यांनी भारतातील जीवनाचे विविध पैलू लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांचे निधन हे छायाचित्रण आणि सांस्कृतिक विश्वाची कधीही न भरुन येणारे नुकसान आहे. या दुःखाच्या क्षणी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर, चाहत्यांबरोबर आणि छायाचित्रकार बंधुभगिनींबरोबर आहेत. ओम शांती.”

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर‍

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai