Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फिनलंडच्या पंतप्रधानांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

फिनलंडच्या पंतप्रधानांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट


नवी दिल्‍ली, 18 फेब्रुवारी 2026

 

फिनलंडचे पंतप्रधान, महामहिम  पेटेरी ओरपो यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

उभय  देशांच्या  व्यापारामध्‍ये  दुप्पट वाढ  करण्याचे उद्दिष्ट असून, त्यामुळे आर्थिक संबंधांना मोठी चालना मिळणार आहे.

या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी 6 जी, नवोन्मेष, स्वच्छ ऊर्जा, जैवइंधन, चक्राकार अर्थव्यवस्था आणि इतर भविष्यकालीन तंत्रज्ञान क्षेत्रामध्‍ये  सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली.

‘एक्स’ या समाज माध्‍यमावरील वेगवेगळ्या पोस्टमध्ये,पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले:

“फिनलंडचे पंतप्रधान, पेटेरी ओरपो यांच्याशी व्यापक चर्चा झाली.

भारत-युरोप संबंधांमध्ये सुवर्णयुगाचा प्रारंभ करणाऱ्या भारत- युरोपीय संघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराला त्यांनी  वैयक्तिक समर्थन दर्शवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारत आणि फिनलंड यांच्यातील व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे;  त्यामुळे उभय देशातील आर्थिक संबंधांना मोठी चालना मिळणार आहे. आम्ही 6जी, नवोन्मेष, स्वच्छ ऊर्जा, जैवइंधन, चक्राकार अर्थव्यवस्था आणि इतर गोष्टींसारख्या भविष्यकालीन तंत्रज्ञान क्षेत्रामध्‍ये सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा केली.

@PetteriOrpo”

 

“Keskustelin laaja-alaisesti Suomen pääministerin Petteri Orpon kanssa. 

Kiitin häntä hänen henkilökohtaisesta tuestaan Intian ja EU:n vapaakauppasopimukselle, joka merkitsee kultakautta Intian ja Euroopan suhteissa. Intian ja Suomen tavoitteena on keskinäisen kaupan kaksinkertaistaminen, mikä vahvistaa taloussuhteita merkittävästi. Keskustelimme myös yhteistyön syventämisestä tulevaisuuden teknologioissa, kuten 6G:ssä, sekä innovaatioiden, puhtaan energian, biopolttoaineiden, kiertotalouden ja muiden alojen parissa.

@PetteriOrpo”

 

* * *

शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai