Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बंगलुरु-एर्नाकुलम एक्सप्रेस रुळावरुन घसरल्याने झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक


बंगलुरु-एर्नाकुलम एक्सप्रेस रुळावरुन घसरल्याने झालेल्‍या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

बंगलुरु-एर्नाकुलम एक्सप्रेस रुळावरुन घसरल्याने झालेल्या जीवीत हानीमुळे आपल्याला दु:ख झाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

जखमींची प्रकृती लवकर ठीक व्हावी अशी इच्छा व्यक्त करतानाच रेल्वेमंत्री आणि अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून वेळेवर मदत मिळावी यासाठी दक्ष असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.