Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रम्हकुमारी परिवाराच्या 80 व्या वर्धापन दिन सोहळयात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधानांचा संवाद

ब्रम्हकुमारी परिवाराच्या 80 व्या वर्धापन दिन सोहळयात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधानांचा संवाद


ब्रम्हकुमारी परिवाराच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेत आणि सांस्कृतिक सोहळयात भारत आणि परदेशातून आलेल्या प्रतिनिधीचे त्यांनी स्वागत केले. प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यापीठाची स्थापना करणारे दादा लेखराज यांच्याविषयी त्यांनी आदरभाव व्यक्त केला. तसेच, वयाच्या 100व्या वर्षापर्यंत समाजाची सेवा करणाऱ्या दादी जानकीजी या सच्च्या कर्मयोगी असल्याचे गौरवोद्‌गार पंतप्रधानांनी काढले.

विविध क्षेत्रात ब्रम्हकुमारी संस्थांनी केलेले काम स्पृहणीय असून, सौर ऊर्जेच्या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यास, ब्रम्हकुमारी संप्रदायाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

स्वच्छ भारत, एलईडी लाईट्‌स अशा उपक्रमांच्या फायद्यांचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.

B.Gokhale/R.Aghor/Anagha