पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ब्रिक्स देशांच्या औषध नियामक संस्थांदरम्यान मानवी उपयोगासाठी वैद्यकीय उत्पादनांच्या नियमन क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.
या करारामुळे संबंधीत पक्षांमध्ये नियामक बाबीबाबत सामंजस्य विकसित करणे शक्य होईल आणि भारतातून ब्रिक्स देशांना वैद्यकीय उत्पादनाची निर्यात वाढवायला मदत होईल.
***
N.Sapre/S.Kane/D.Rane