Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतआणिगयानायांच्यातल्यानवीकरणीयउर्जासहकार्य सामंजस्यकराराबाबतकेंद्रीयमंत्रीमंडळालादेण्यातआलीमाहिती


नवीकरणीय उर्जा सहकार्याबाबत भारत आणि गयाना यांच्यातल्या सामंजस्य कराराबाबत केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत माहिती देण्यात आली. 30जानेवारी 2018 ला केंद्रीय उर्जा आणि नवीकरणीय उर्जा राज्य मंत्री आर. के. सिंग आणि गयानाचे द्वितीय उप राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्री कार्ल ग्रीनिच यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

नवीकरणीय उर्जा क्षेत्रात, परस्पर लाभ, समानता आणि प्रतिसाद यावर आधारित तंत्र विषयक द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्यात्मक संस्थागत सबंधासाठी पाया भरणी करण्याचे दोन्ही देशांचे उद्दिष्ट आहे.सहकार्य विषयक चर्चा करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी आणि देखरेख ठेवण्यासाठी संयुक्त कार्यकारी समिती स्थापन करण्याची तरतूद या सामंजस्य करारात आहे. तज्ञ आणि माहितीचे आदान प्रदान करण्याचे या कराराचे उद्दिष्ट आहे.

या सामंजस्य करारामुळे उभय देशातले सहकार्य दृढ व्हायला मदत होणार आहे.

******

B.Gokhale/N.Chitale