पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि बांगलादेशात फेनी नदीसंदर्भात झालेल्या कराराला मंजुरी देण्यात आली. या करारानुसार, भारतातील नदीतून 1.82 क्युसेक्स पाणी सोडले जाणार आहे. भारतातील त्रिपुरा राज्यातल्या सब्रूम गावासाठी यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
लाभ :
सध्या भारत आणि बांगलादेश दरम्यान फेनी जलवाटपासंदर्भात कोणताही करार अस्तित्वात नाही. सध्या सब्रूम गावाला असणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. या करारामुळे गावाला पाणीपुरवठा होईल.
B.Gokhale/R.Aghor/P.Kor