Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय माहिती सेवा संवर्गाच्या आढाव्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय माहिती सेवेतील अ गटाच्या फेररचनेला मंजूरी दिली.

अन्य स्तरावरील कपात जुळवून घेत दोन सर्वोच्च पदे, उच्च प्रशासकीय श्रेणीतील पाच पदे आणि वरिष्ठ प्रशासकीय श्रेणी स्तरावरील 19 पदांचा समावेश या फेररचनेत असेल. भारतीय माहिती सेवा संवर्गातील सध्याच्या समस्या दूर करुन या सेवेतील अधिकाऱ्यांच्या कारर्कीर्दीत यामुळे सुधारणा अपेक्षित आहे. या आढाव्यामुळे केंद्र सरकारच्या प्रसार माध्यम आणि संवादविषयक कार्यक्रमांचे अधिक चांगले निकाल अपेक्षित आहेत.

B.Gokhale/M.Pange/Anagha