Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि अर्जेंटिना दरम्यान पर्यटन क्षेत्रातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि अर्जेंटिना दरम्यान पर्यटन क्षेत्रातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.

उभय देशांमधील या करारामुळे पर्यटन क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एक संस्थात्मक यंत्रणा निर्माण व्हायला मदत होईल.

N.Sapre/S.Kane/P.Kor