Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि जर्मनी दरम्यान नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सहकार्यावरील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि जर्मनी दरम्यान नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सहकार्यावरील सामंजस्य करारावर ज्याचे नाव संयुक्त इच्छा घोषणापत्र असे आहे , यावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली. यामुळे भारत आणि जर्मनी दरम्यान सुरक्षित, परिणामकारक आणि प्रभावी विमान वाहतुकीच्या विकासाला चालना मिळेल.

संयुक्त इच्छा घोषणापत्र स्वरूपातील सामंजस्य करार भारत आणि जर्मनी दरम्यान नागरी उड्डाण संबंधामध्ये एक महत्वपूर्ण टप्पा आहे. आणि यामध्ये उभय देशांदरम्यान अधिक व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्याची क्षमता आहे.

संयुक्त इच्छा घोषणापत्रावर स्वाक्षरी करून नागरी विमान वाहतूक क्षेत्रात ज्ञान आणि अनुभवाचे आदान प्रदान, सहकार्य याद्वारे प्रस्थापित संबंध अधिक बळकट करण्याची दोन्ही देशांची इच्छा आहे. संयुक्त इच्छा घोषणापत्राचा मुख्य उद्देश पुढील क्षेत्रात परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देणे हा आहे:

1. हवाई सुरक्षा आणि हवाई वाहतूक व्यवस्थापन

चर्चासत्रे, दौरे आणि अन्य योग्य माध्यमातून हवाई सुरक्षा आणि हवाई वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित उत्तम पद्धती आणि माहितीचे आदान प्रदान

2. हेलिपोर्ट्स आणि हेलिकॉप्टर वैद्यकीय सेवा

हेलिपोर्ट्स आणि हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संबंधित उत्तम पद्धती आणि माहितीचे आदान प्रदान

3. नियमन आणि धोरण

महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आयसीएओ येथे सहकार्य सुरु ठेवणे

4. कॉर्पोरेट आणि व्यापार हवाई वाहतूक विकास

व्यापार आणि अव्यावसायिक हवाई वाहतुकीसाठी सुविधांबाबत माहितीचे आदान-प्रदान

5. पर्यावरण

i) शाश्वत आणि पर्यावरण-स्नेही एरोड्रोम विकास आणि नियोजनावर विशेष भारासह सरकारच्या एरोड्रोम संबंधीच्या माहितीचे आदान -प्रदान

ii) राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर हवाई वाहतुकीशी संबंधित हरित वायू उत्सर्जन आणि हवामान बदल समस्येवर तोडगा काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य

6. प्रशिक्षण आणि कौशल्य विकास हवाई सुरक्षा क्षेत्रात तांत्रिक आणि बिगर-तांत्रिक सहकार्य आणि प्रशिक्षणातील भागीदारीच्या संधींचा शोध घेणे

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar