पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि जॉर्डन यांच्यात मनुष्यबळ क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
उभय देशांदरम्यान कंत्राटी रोजगाराच्या प्रशासनात सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन देणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश असून, त्यातून भर्ती प्रक्रियेत अत्याधुनिक सुधारणा प्रतिबिंबित होतात आणि जॉर्डनमध्ये भारतीय कामगारांचे संरक्षण आणि कल्याण यात वाढ होईल. भारतीय मनुष्यबळाच्या भर्तीसाठी ऑनलाईन पोर्टलच्या वापरातील उभय देशांच्या सहकार्यामुळे भर्ती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल आणि भ्रष्टाचार रोखण्यास मदत होईल अशी आशा आहे.
हा करार पाच वर्षांसाठी वैध असेल ज्यात संयुक्त तांत्रिक समितीच्या माध्यमातून स्वयंचलित नूतनीकरण आणि देखरेख यंत्रणेची तरतूद आहे.
N.Sapre/S.Kane/D.Rane