Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि ट्युनिशिया यांच्यात न्याय क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि ट्युनिशिया यांच्यात न्याय क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.

गेल्या काही वर्षात भारत आणि ट्युनिशिया यांच्यातले सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध सकारात्मक दिशेने विकसित झाले आहेत. न्याय क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यामुळे उभय देशांदरम्यान चांगले संबंध वृद्धिंगत होतील आणि न्यायालयीन सुधारणा क्षेत्रात नवीन आयाम प्रस्थापित होतील.

APS/S.Tupe/S.Kane/Anagha