Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि ताजिकिस्तान यांच्यात सीमा शुल्क बाबतीत सहकार्य आणि परस्पर साहाय्यावरील कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि ताजिकिस्तान यांच्यात सीमा शुल्क बाबतीत सहकार्य आणि परस्पर साहाय्यावरील करारावर स्वाक्षरी करायला आणि मान्यता द्यायला मंजुरी दिली.

सीमाशुल्क गुन्हे रोखण्यासाठी आणि त्यांचा तपास करण्यासाठी संबंधित माहिती उपलब्ध होण्यास या करारामुळे मदत होईल. तसेच या करारामुळे उभय देशांमध्ये व्यापार सुलभ होण्यास आणि सीमाशुल्क विभागांकडून मंजुरी मिळण्यास मदत होईल.

N.Sapre/S.Kane/P.Kor