Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि फिजी यांच्यात नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात सहकार्यावरील सामंजस्य कराराबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला अवगत करण्यात आले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला भारत आणि फिजी यांच्यात नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य कराराबाबत माहिती देण्यात आली . फिजीतील सुवा येथे 24 मे 2017 रोजी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

उभय देशांचा उद्देश परस्पर लाभात समानता आणि परस्पर आदान प्रदानाच्या आधारे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जेच्या मुद्यांवर द्विपक्षीय तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि त्याला चालना देण्यासाठी एक सहकारी संस्थागत संबंधांसाठी पाया तयार करणे हा आहे. सामंजस्य करारात एक संयुक्त कृती समिती स्थापन करण्याची तरतूद आहे जेणेकरून सहकार्यांशी संबंधित क्षेत्रांशी निगडित समस्यांचा आढावा, देखरेख आणि त्याबाबत चर्चा करता येईल. यात तज्ञांचे आदान प्रदान आणि माहितीच्या नेटवर्किंगची तरतूद आहे.

सामंजस्य करारामुळे उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यात मदत होईल.

N.Sapre/S.Kane/D.Rane