पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि फ्रान्स दरम्यान “शैक्षणिक पात्रतेची परस्पर मान्यता” संदर्भात आणि दोन्ही देशांमध्ये मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययन कालावधीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे. फ्रान्सच्या अध्यक्षांच्या आगामी भारत दौऱ्यादरम्यान या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
या करारामुळे भारत आणि फ्रान्स दरम्यान शैक्षणिक संबंध अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल आणि दीर्घकाळ उभय देशांमधील शैक्षणिक संबंधांना प्रोत्साहन मिळेल. या करारामुळे दोन्ही देशातील विद्यार्थ्यांना एकमेकांच्या देशात येण्याजाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि विद्यार्थ्यांना दुसऱ्या देशात शिकणे सुरु ठेवण्याच्या संधी पडताळता येतील. यामुळे नवीन भागीदारी आणि संशोधनाच्या माध्यमातून उच्च शिक्षण क्षेत्रात सर्वोत्कृष्टतेला प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे भारतात शिक्षणाचा दर्जा सुधारेल.
N.Sapre/S.Kane/D.Rane