पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि फ्रान्स दरम्यान स्थलान्तरण आणि गतिशीलता भागीदारी करारावर स्वाक्षरी करण्यास मंजुरी दिली आहे. फ्रान्सच्या अध्यक्षांच्या आगामी भारत दौऱ्यादरम्यान या करारावर स्वाक्षरी केली जाण्याची शक्यता आहे.
हा सामंजस्य करार दोन्ही देशाच्या लोकांमध्ये संपर्क वाढवणे, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि कुशल व्यावसायिकांचे येणे-जाणे वाढवण्यात तसेच उभय देशांदरम्यान अवैध स्थलांतर आणि मानव तस्करीशी संबंधित मुद्यांवर सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण ठरेल. फ्रान्सबरोबर भारताचे वेगाने वाढत असलेल्या संबंधांचे द्योतक आहे आणि उभय देशांमधील वाढत विश्वास आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.
सुरुवातीला हा करार सात वर्षांसाठी वैध असेल. यामध्ये स्वयंचलित नूतनीकरण आणि एका संयुक्त कृतीगटामार्फत देखरेख यंत्रणेची तरतूद आहे.
N.Sapre/S.Kane/D.Rane