पीएम्इंडिया
मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी विशेषत: स्त्रिया व बालकांच्या तस्करीला रोखण्यासाठी भारत आणि बहरीन दरम्यान एका सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 10 मार्च 2016 रोजी मान्यता दिली आहे.
या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांमधील मैत्रीपुर्ण संबंध वृद्धिंगत होणार असून यामध्ये मानवी तस्करी विशेषत: स्त्रिया व बालकांच्या तस्करीसंदर्भात प्रतिबंध, बचावकार्य , पुनर्प्राप्ती आणि परत पाठवणी या विषयांवरील द्विपक्षीय सहकार्याला चालना मिळणार आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत तस्करी विरोधी पथक व कृती दल मानवी तस्करीला रोखण्यासाठी दोन्ही बाजूंनी कार्य करणार आहे.
या कराराच्या अंमलबजावणीची दोन्ही बाजूंनी पाहणी करण्यासाठी एका संयुक्त कृती दलाची स्थापना करण्यात येणार आहे. बहरीन येथे प्रामुख्याने वेठबिगारी व वेश्याव्यवसायाकरीता महिला व पुरुषांची तस्करी केली जाते.
या सामंजस्य करारावर एप्रिल 2016 च्या पहिल्या आठवड्यात बहरीनला केंद्रीय गृह मंत्र्यांच्या आगामी भेटी-दरम्यान स्वाक्षरी होणे अपेक्षित आहे.
D.Wankhede/S.Tupe/M.Desai