Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि बांग्लादेश दरम्यान हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य आराखड्यावर स्वाक्षरी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि बांग्लादेश दरम्यान हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य आराखड्यावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली.

समानता आणि परस्पर लाभ या आधारावर हायड्रोकार्बन क्षेत्रात भारत-बांग्लादेश द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सहकारी संस्थात्मक यंत्रणा स्थापन करणे हा या प्रस्तावित सामंजस्य आराखड्याचा उद्देश आहे.

उप-प्रादेशिक आणि प्रादेशिक स्तरावर द्विपक्षीय सहकार्याला हा आराखडा प्रोत्साहन देतो. यामुळे विकासाला चालना मिळेल तसेच उभय देशांना त्यांच्या विकासविषयक आकांक्षा, शांततामय आणि समृद्ध दक्षिण आशियाचे समान स्वप्न प्रत्यक्षात साकारायला मदत मिळेल.

प्रस्तावित सामंजस्य आराखडा बंधनकारक नसून पाच वर्षांसाठी वैध असेल.

APS/S.Tupe/S.Kane/Anagha