Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि बांग्लादेश यांच्यातली दुसरी क्रॉस बॉर्डर ट्रान्समिशन इंटरकनेक्शन यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडून लोकार्पण

भारत आणि बांग्लादेश यांच्यातली दुसरी क्रॉस बॉर्डर ट्रान्समिशन इंटरकनेक्शन यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडून लोकार्पण


भारत आणि बांग्लादेश यांच्यातल्या दुसऱ्या क्रॉस बॉर्डर ट्रान्समिशन इंटरकनेक्शन यंत्रणेचे नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते संयुक्तपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण झाले. त्रिपुरामधले सुरजयम्नीनगर आणि बांग्लादेशमधले दक्षिण कोमील्ला यामुळे जोडले जाणार आहे.आगरतळा आणि बांग्लादेशमधले कॉक्स बाजार यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करणाऱ्या योजनेचेही दोन्ही नेत्यांनी लोकार्पण केले.

भारत आणि बांग्लादेश यांच्या संबंधातला हा ऐतिहासिक क्षण असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या, भारताशी असलेल्या स्नेहपूर्ण संबंधांचे पंतप्रधानांनी स्मरण केले. नजिकच्या काळात उभय देशात सहकार्यासाठी नवी दालने खुली झाल्याचे त्यांनी स्वागत केले. बंगबंधूची दृष्टी आणि विचारांचा वारसा पुढे नेत असल्याबद्दल पंतप्रधानांनी, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची प्रशंसा केली.

भारताच्या पूर्व भागात इंटरनेटचा नवा मार्ग खुला होत असण्याला आपण अतिशय महत्त्व देत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यामुळे या भागातल्या दळणवळणाला चालना मिळणार असल्याने ईशान्येकडच्या राज्यांना त्याचा मोठा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. उभय देशात सध्याच्या काळात रस्ते आणि डिजीटल कनेक्टिव्हिटीसह विविध मार्गांनी कनेक्टिव्हिटी वाढत असल्यावर त्यांनी भर दिला.

N. Chitale /S.Tupe / M. Desai