Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि बेलारूस यांच्यात तेल आणि वायू क्षेत्रातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि बेलारूस यांच्यात तेल आणि वायू क्षेत्रातील सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. बेलारूसच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान 12सप्टेंबर 2017 रोजी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

या करारामुळे भारत आणि बेलारूस दरम्यान द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन मिळेल आणि तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान आर्थिक आणि वाणिज्य सहकार्य वाढेल. या करारांतर्गत, दोन्ही देश क्षमता निर्मिती, तंत्रज्ञान हस्तांतरण, तेल शोध आणि भारतातील परिपक्व तेल क्षेत्रांच्या विकासासाठी सहकार्य स्थापित करण्याच्या दिशेने काम करतील.

हा करार स्वाक्षरी झाल्यापासून तीन वर्षांसाठी लागू राहील.

N.Sapre/S.Kane/P.Kor