Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि ब्राझील यांच्यातील सामाजिक सुरक्षेसंदर्भातील कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि ब्राझील यांच्यात सामाजिक सुरक्षा विषयक करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे.

 

पार्श्वभूमी:

अल्प कालावधीसाठी परदेशात काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिक / कुशल कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि भारतीय कंपन्यांची स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी भारत इतर देशांशी द्विपक्षीय सामाजिक सुरक्षा करारांमध्ये (एसएसए) करार करीत आहे.

 

एसएसए विस्तृत प्रमाणात खालील तीन फायदे प्रदान करतात:

·         कामगारांद्वारे (असम्बद्धता) दुहेरी सामाजिक सुरक्षा योगदान देणे टाळणे;

·         फायद्याचे सुलभ विप्रेषण (निर्यातक्षमता);

·         लाभांचा तोटा टाळण्यासाठी (दोन देशांमध्ये) योगदानाचा कालावधी एकत्रित करणे (संपूर्ण करणे). या कराराद्वारे परदेशात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना अपंगत्व विमा लाभदेखील देण्यात येणार आहे. आजपर्यंत भारताने 18 देशांशी एसएसए केले आहे.

 

ब्रिक्स राष्ट्रांसमवेत सामाजिक सुरक्षा कार्यक्रमांवर स्वाक्षरी करण्याच्या संकल्पनेवर 9 जून 2016 रोजी जिनिव्हा येथे आणि 27-28 सप्टेंबर 2016 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीत चर्चा झाली. ब्रिक्स देशांमधील सामाजिक सुरक्षा करार संपुष्टात येण्याची शक्यताही 8 व्या ब्रिक्स नेत्यांच्या शिखर परिषदेच्या गोवा घोषणेत नमूद आहे. गोवा घोषणेच्या अनुशंगाने भारत आणि ब्राझील यांनी 13 ते 16 मार्च 2017 रोजी ब्राझीलियामध्ये एसएसए वर वाटाघाटी केल्या. वाटाघाटीच्या शेवटीदोन्ही बाजूंनी सामाजिक सुरक्षिततेवरील कराराच्या अंतिम मसुद्याला मान्यता दिली.

लाभधारकांच्या माहितीसाठी स्वाक्षरी केलेला करार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या संकेतस्थळावर सादर केला जाईल जेणेकरुन दुहेरी सामाजिक सुरक्षा योगदान देऊ नये म्हणून ते प्रमाणपत्रे सुरक्षित ठेवू शकतील.

सध्या भारतात सुमारे एक हजार ब्राझिलियन राहत आहेततर सुमारे 4,700 भारतीय ब्राझीलमध्ये राहत आहेत.

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane