पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि मॅकेडोनिया यांच्यात आरोग्य क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.
या सामंजस्य करारात पुढील क्षेत्रांचा समावेश आहे-
· आरोग्य क्षेत्रात क्षमता निर्मिती आणि मनुष्यबळाचे अल्पकालीन प्रशिक्षण
· डॉक्टर्स, अधिकारी आणि अन्य आरोग्य व्यावसायिक आणि तज्ज्ञांचे आदान प्रदान आणि प्रशिक्षण
· मनुष्यबळ विकास आणि आरोग्य सुविधा उभारण्यासाठी सहकार्य
· परस्परांनी ठरवलेले सहकार्याचे अन्य कुठलेही क्षेत्र
· या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि सहकार्याचे तपशील अधिक विस्तृत करण्यासाठी एक कृतीगट स्थापन केला जाईल.
N.Sapre/S.Kane/D.Rane