पीएम्इंडिया
भारत आणि सायप्रस यांच्यातल्या व्यापारी जहाजांबाबतच्या,एप्रिल 2017 मध्ये स्वाक्षऱ्या झालेल्या कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी देण्यात आली.
दोन्ही देशातल्या सागरी व्यापार विकासाला अडथळा ठरू शकणारे घटक दूर करण्याबाबत सहकार्य करण्याचा मार्ग या करारामुळे मोकळा झाला आहे.उभय देशातल्या तसेच तिसऱ्या देशातल्या मालाच्या वाहतुकीलाही यामुळे चालना मिळणार आहे.यामुळे रोजगारासाठीचे तसेच परस्परांच्या जहाजावरच्या खलाशांचे कल्याण,कामाच्या ठिकाणाची स्थिती सुधारण्याबाबतचे सहकार्य वाढण्यासाठी मदत होणार आहे.
N.Sapre/N.Chitale/P.Kor