Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि सेनेगल यांच्यातल्या आरोग्य आणि औषध क्षेत्रातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


भारत आणि सेनेगल यांच्यातल्या आरोग्य आणि औषध क्षेत्रातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या विभागात प्रामुख्याने सहकार्य करण्यावर भर राहील

1) एकात्मिक रोग निदान आणि देखरेख

2) वैद्यकीय संशोधन

3) आपत्कालीन मदत

4) रुग्णालय व्यवस्थापन

5) औषध आणि औषध निर्माण उत्पादन आणि रुग्णालय साधने

6) पारंपरिक औषधे

7) एड्स नियंत्रण

8) परस्पर हिताचे आणखी काही विभाग

सहकार्याविषयी अधिक तपशील ठरवण्यासाठी आणि सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीसाठी कार्यकारी गटाची स्थापना करण्यात येणार आहे.

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar