पीएम्इंडिया
अवयव प्रत्यारोपण सेवेबाबत, भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आरोग्य सेवा महासंचालनालय आणि स्पेन मधल्या संबंधित संस्था यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
यामुळे अवयव प्रत्यारोपणाबत द्विपक्षीय सहकार्य सुलभ होणार आहे. या करारामुळे या क्षेत्रातले ज्ञान मिळवण्यासाठी मदत होणार असून, त्याचा लाभ, अवयव निकामी झालेल्या रुग्णांना होणार आहे.
स्पेनबरोबर होणाऱ्या आगामी द्विपक्षीय बैठकीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या अपेक्षित आहेत.
N.Sapre/N.Chitale/D.Rane