Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

“भारत-इस्रायल औद्योगिक संशोधन आणि विकास आणि तंत्रज्ञान संशोधन निधी” संबंधी सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि इस्रायल यांच्यातील “भारत-इस्रायल औद्योगिक संशोधन आणि विकास आणि तंत्रज्ञान संशोधन निधी” संबंधी सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे. जुलै २०१७ मध्ये हा करार करण्यात आला होता.

भारत आणि इस्रायल या निधीसाठी प्रत्येकी वार्षिक चार दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके पाच वर्षे योगदान देतील. उभय देशांच्या प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश असलेल्या संयुक्त मंडळाकडे या निधीचे प्रशासन असेल.

या सामंजस्य करारामध्ये द्विपक्षीय औद्योगिक संशोधन आणि विकास तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात अभिनव सहकार्याला चालना देण्याबाबत विचार करण्यात आला आहे, ज्यामुळे अभिनव किंवा तंत्रज्ञान आधारित नवीन किंवा सुधारित उत्पादने, सेवा किंवा प्रक्रियासाठी संयुक्त प्रकल्पाना सहकार्य प्रदान केले जाईल. यामुळे जल, कृषी, ऊर्जा आणि डिजिटल तंत्रज्ञान, यासारख्या परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये किफायतशीर तंत्रज्ञान संशोधन उपलब्ध होईल.

यामुळे इस्रायल आणि भारताची पूरक शक्ती गतिमान होईल आणि संयुक्त प्रकल्पाना प्रोत्साहन मिळेल.

B.Gokhale/S.Kane/D.Rane