Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-कोलंबिया दरम्यान पर्यटन क्षेत्रात परस्पर सामंजस्य करार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय आणि कोलंबियाच्या व्यापार उद्योग आणि पर्यटन मंत्रालयासोबत झालेल्या परस्पर सामंजस्य कराराला मंजूरी दिली.

या कराराचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे

अ- पर्यटन क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवणे

ब- पर्यटन क्षेत्राशी संबंधित तपशील आणि माहिती यांची परस्परांमध्ये देवाणघेवाण

क- पर्यटन व्यवसायातील भागधारक ज्यात हॉटेल्स आणि टूर ऑपरेटर्स दरम्यान सहकार्य वाढवणे

ड- मनुष्यबळ विकासासाठी कार्यक्रमांची परस्परांदरम्यान देवाणघेवाण

ई – दोन्ही बाजूंनी पर्यटनाचा विकास व्हावा म्हणून टूर ऑपरेटर्स, प्रसारमाध्यमे, समाजातील प्रभावी व्यक्ती यांच्या परस्परांना भेटी

फ- जाहिरात, विपणन, स्थळांचा विकास आणि व्यवस्थापन यासाठी परस्परांदरम्यान अनुभवाची देवाण घेवाण करणे.

ग- परस्परांच्या देशांमध्ये होणाऱ्या पर्यटक मेळावे, जत्रा आणि प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदवावा.

कोलंबिया भारतीय पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने उदयोन्मुख बाजारपेठ आहे. पर्यटन मंत्रालयाने ऑक्टोबर 2014 मध्ये कोलंबियातील बोगोटा याठिकाणी एक रोड शो आयोजित केला होता. याला दोन्ही देशांच्या पर्यटन उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

तशाच प्रकारे, भारत कोलंबियासाठी स्रोत बाजारपेठेसाठी ठोस पर्याय आहे. भारतातून परदेशी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या 2013 मध्ये 16.63 दशलक्ष होती. या करारामुळे दोन्ही देशांना पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी विधायक संवाद साधता येईल. तसेच यामुळे दोन्ही देशांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

दोन्ही देशांदरम्यान सलोख्याचे संबंध आहेत, ज्याचा उपयोग जागतिक मुद्दे आणि विविध परस्परहितांच्या मंचासाठी करता येईल. पर्यटनक्षेत्रात भारताचे संबंध अधिक वृद्धींगत व्हावे यासाठी हा परस्पर सामंजस्य करार एक संस्थात्मक यंत्रणा आहे

S.Thakur/N.Sapre