Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-न्यूझीलंड शिष्टमंडळ-स्तरीय चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले प्रास्ताविक

भारत-न्यूझीलंड शिष्टमंडळ-स्तरीय चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले प्रास्ताविक


नवी दिल्‍ली, 11 जुलै 2026

 

महोदय,

तुमच्या मैत्रीपूर्ण आणि आपुलकीच्या शब्दांसाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो.

काल रात्री तुमचे स्वतः विमानतळावर स्वागतासाठी येणे, हा आपल्यातच एक अतिशय मोठा आदर दर्शवणारा प्रसंग होता, आणि त्याबद्दल मी वैयक्तिकरित्या तुमचे विशेष आभार व्यक्त करतो.

तुमचे मंत्री महोदय रात्री संपूर्ण वेळ माझ्यासोबत उपस्थित होते. माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की, तब्बल 40 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांचा न्यूझीलंड दौरा होत आहे; आणि तुम्ही एका अर्थाने तुमच्या आर्थिक राजधानीत या कार्यक्रमाचे आयोजन करून भारत आणि न्यूझीलंडच्या संबंधांना एक नवी ऊर्जा देण्याची संधी निर्माण केली आहे. याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे.

न्यूझीलंडच्या नागरिकांना भेटल्यानंतर त्यांचे भारताप्रती असलेले प्रेम आणि आपुलकी पाहून कोणतीही व्यक्ती भावुक होईल; त्यांच्या या स्नेहाने माझ्या मनाला मनापासून स्पर्श केला आहे आणि यासाठी देखील मी आपला अत्यंत ऋणी आहे.

आपल्या संबंधांमधील हा एक ऐतिहासिक टप्पा आहे, जो आपल्या नातेसंबंधांतील नवी ऊर्जा आणि आपल्या मैत्रीच्या नव्या संकल्पाचा पुनरुच्चार करणारा आहे. तुम्ही जेव्हा भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा मुक्त व्यापार कराराची सुरुवात झाली होती. आणि इतक्या कमी कालावधीत संपूर्ण न्यूझीलंडने एकत्र येऊन हा मुक्त व्यापार करार प्रत्यक्षात आणून दाखवला. जगभरात कदाचित पहिल्यांदाच इतक्या कमी वेळात असे यश मिळाले असावे. आणि याबद्दल मी तुमचे नेतृत्व, तुमचे सरकार आणि तुमच्या संपूर्ण टीमचे मनापासून खूप खूप आभार मानतो.

गेल्या वर्षी तुम्ही होळीच्या सुमारास भारतात आला होता. तुमच्या त्या दौऱ्याने आपल्या संबंधांमध्येही नवे रंग भरले होते, कारण होळीच्या रंगांचे आपले एक वेगळेच महत्त्व असते आणि त्याची प्रचिती आम्हाला आली. मला अत्यंत आनंद होत आहे की, आज आपण आपले संबंध धोरणात्मक भागीदारीच्या सूत्रात बांधायला जात आहोत. हा मैलाचा दगड आपल्याला अधिक ऊर्जा आणि अधिक आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल.

महोदय,

लोकशाही मूल्यांवरील आपला दृढ विश्वास आपल्याला नैसर्गिक भागीदार बनवतो. हे नाते अगदी ‘मेड फॉर ईच अदर’ (एकमेकांसाठीच बनलेले) असल्यासारखे आहे. दुसऱ्या बाजूने विचार केला, तर दोन सागरी देश या नात्याने आपले निकटचे सहकार्य इंडो-पॅसिफिक क्षेत्राला एक नवी ताकद देते; आणि शांततेचे आपले जे उद्दिष्ट आहे, ते साध्य करण्यासाठी आपले संबंध एक नवी ऊर्जा भरू शकतात.

मला पूर्ण विश्वास आहे की, माझ्या या दौऱ्यामुळे आपण आपल्या द्विपक्षीय संबंधांना आणखी बळकटी देऊ आणि जागतिक शांतता, स्थैर्य व सुरक्षेमध्ये एकत्र येऊन आपले योगदान वाढवू. आपण एका अर्थाने अशा उत्प्रेरकाची भूमिका बजावू शकतो, जो शांततेच्या बाजूने असेल, शांततेसाठी असेल; आणि शांततेच्या माध्यमातून आपण जागतिक कल्याणाच्या दिशेने पुढे पाऊल टाकू शकू.

तुमच्या या आत्मीयतेने भरलेल्या स्वागतासाठी आणि सन्मानासाठी मी पुन्हा एकदा मनापासून आपले खूप खूप आभार मानतो.

 

* * *

आशिष सांगळे/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai