पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने करसंबंधी माहितीच्या देवाणघेवाणीसाठी भारत आणि सामोआ यांच्यातील करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली.
या करारामुळे भारत आणि सामोआ यांच्यात करविषयक उद्देशासाठी माहितीच्या आदानप्रदानाचा ओघ वाढेल आणि यामुळे कर टाळणे आणि कर चुकवेगिरीला आळा घालण्यास मदत मिळेल.
सध्या कोणतीही आर्थिक बंधने नाहीत. 500 अमेरिकन डॉलर्सपेक्षा आधिक खर्च आल्यास, तो भारत करेल. अन्य करविषयक माहिती करारांमध्येही अशाच प्रकारची तरतूद आहे.
B.Gokhale/S.Kane/D. Rane