पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2025
सिंगापूरचे पंतप्रधान मा. लॉरेन्स वाँग यांच्या भारताच्या अधिकृत दौऱ्याच्या निमित्ताने, भारत आणि सिंगापूर यांच्यातील सर्वंकष सामरिक भागीदारीसाठीच्या कार्ययोजना (रोडमॅप) विषयक संयुक्त निवेदन
1. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून सिंगापूरचे पंतप्रधान माननीय लॉरेन्स वाँग यांनी 2 ते 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत भारताचा अधिकृत दौरा केला. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले ज्यात भारत-सिंगापूर यांच्यातील सर्वंकष सामरिक भागीदारी अधिक बळकट करण्याचा रोडमॅप मांडण्यात आला.
2. 4 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान लॉरेन्स वाँग यांनी व्यापक चर्चा केली. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान वाँग यांनी पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांनी भारताच्या राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. तसेच, पंतप्रधान वाँग यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण केली. परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही पंतप्रधान वाँग यांची भेट घेतली.
3. या वर्षी भारत आणि सिंगापूर यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. दोन्ही पंतप्रधानांनी विश्वास आणि परस्पर सन्मानावर आधारित मैत्रीच्या दीर्घ परंपरेची दखल घेतली आणि विविध क्षेत्रांत झालेल्या व्यापक सहकार्याचे कौतुक केले. त्यांनी द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि त्याबद्दल समाधान व्यक्त केले. यात, सप्टेंबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरला दिलेली अधिकृत भेट, जानेवारी 2025 मध्ये सिंगापूरचे अध्यक्ष श्री. थरमन शणमुगरत्नम यांची राजकीय भारत भेट, तसेच ऑगस्ट 2025 मध्ये नवी दिल्ली येथे झालेली तिसरी भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय परिषद, अशा उच्चस्तरीय संवादांचा समावेश आहे. या संबंधांनी राजकीय, आर्थिक, सुरक्षाविषयक, तंत्रज्ञान, शिक्षण, जनतेदरम्यानचे संबंध आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये, सर्वांगीण सहकार्याचे रूप घेतले आहे.
4. दोन्ही पंतप्रधानांनी, सप्टेंबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौर्यादरम्यान द्विपक्षीय संबंध, ‘व्यापक धोरणात्मक भागीदारी’ (Comprehensive Strategic Partnership – CSP) या स्तरावर नेण्याच्या कराराची आठवण करून दिली. त्यावर पुढे काम करताना त्यांनी या भागीदारीसाठी भविष्याभिमुख आणि अर्थपूर्ण असा एक रोडमॅप स्वीकारण्याचे मान्य केले. हा रोडमॅप पुढील टप्प्यातील संबंधांना दिशा आणि दृष्टी देणार असून, पुढील आठ प्रमुख क्षेत्रांत सहकार्य अधिक मजबूत करणार आहे: 1) आर्थिक सहकार्य 2) कौशल्य विकास 3) डिजिटलीकरण 4) शाश्वतता 5) संपर्क आणि दळणवळण(कनेक्टिव्हिटी) 6) आरोग्यसेवा आणि औषधोपचार 7) जनतेचे परस्पर दरम्यानचे तसेच सांस्कृतिक आदान-प्रदान 8) संरक्षण आणि सुरक्षाविषयक सहकार्य
सी एस पी साठी कार्ययोजना
आर्थिक सहकार्य : भारत आणि सिंगापूर यांच्यातील आर्थिक संबंध अधिक मजबूत करणे आणि नव्या, भविष्याभिमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे.
कौशल्य विकास : कौशल्यविकास आणि क्षमता वृद्धी यामध्ये भागीदारी
डिजिटलीकरण: डिजिटल आणि आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवणे
शाश्वतता: शाश्वत विकास आणि हरित व्यापारात सहकार्याच्या संधींचा शोध घेणे
दळणवळण: सागरी आणि हवाई वाहतूक दळणवळणाचा विस्तार
आरोग्यसेवा आणि औषध: आरोग्यसेवा आणि औषध क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणे
संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य: प्रादेशिक शांतता आणि स्थिरता वाढविण्यासाठी धोरणात्मक सहकार्य
5. व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या अंमलबजावणीतील प्रगतीचा दरवर्षी आढावा घेण्यासाठी ‘भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद’ ही एक अग्रगण्य यंत्रणा म्हणून कायमस्वरूपी स्विकारण्याबद्दल दोन्ही पंतप्रधानांनी सहमती दर्शविली.
* * *
सोनल तुपे/आशुतोष सावे/उमा रायकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
A shining example of India-Singapore collaboration! https://t.co/xOnsBMGaWr
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2025