Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महान हॉकीपटू मोहम्मद शाहिद यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांतर्फे शोक व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान हॉकीपटू मोहम्मद शाहिद यांच्या अकाली आणि दुर्भाग्यपूर्ण निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान म्हणाले, “ मोहम्मद शाहिद यांच्या अकाली आणि दुर्भाग्यपूर्ण निधनामुळे भारताने एक मेहनती आणि गुणवान खेळाडू गमावला आहे.

मोहम्मद शाहिद यांना वाचवण्यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न केले मात्र दुर्देवाने त्यांचा जीव वाचवण्यासाठी आपले प्रयत्न आणि प्रार्थना कमी पडल्या. त्यांना मानवंदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”

S.Kane/B.Gokhale