पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत, भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान मानवी तस्करीला प्रतिबंध करणे आणि त्याच्याशी लढा देण्याबाबत सहकार्य करण्यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी मंजूरी देण्यात आली. मंजूरी मिळाल्यानंतर या सामंजस्य करारावर लवकरच स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे.
या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांतील मैत्रीचे बंध अधिक दृढ होतील आणि मानवी तस्करी विशेषत: स्त्रिया आणि मुलांच्या तस्करीशी संबंधित प्रतिबंध, सुटका, पुन्हा ताब्यात घेणे आणि परत पाठवणी या मुद्दयांबाबत द्विपक्षीय सहकार्यात वाढ होईल.
J.Patnakar/B.Gokhale