Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मिचौंग चक्रीवादळामुळे विशेषत: तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त


 

मिचौंग चक्रीवादळामुळे विशेषतः तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख  व्यक्त केले आहे.
या चक्रीवादळात जखमी झालेल्या किंवा बाधीत झालेल्यांसाठीही मोदी यांनी प्रार्थना केली आहे. आणि बाधितांना मदत करण्यासाठी प्रशासन  प्रत्यक्ष ठिकाणी  कार्यरत आहे  आणि परिस्थिती पूर्णपणे सामान्य होईपर्यंत त्याचे काम ते सुरू ठेवेल , असे त्यांनी सांगितले.

एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
मिचौंग चक्रीवादळामुळे विशेषत: तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.या चक्रीवादळामुळे जखमी किंवा बाधीत  झालेल्या लोकांसाठी  प्रार्थना करत आहे. बाधितांना मदत करण्यासाठी प्रशासन  प्रत्यक्ष ठिकाणी  कार्यरत आहेत  आणि परिस्थिती पूर्णपणे सामान्य होईपर्यंत त्यांचे काम ते सुरू ठेवेल  ”. 

***

JPS/SBC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai