Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मुंबई आणि परिसरातल्या मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या परिस्थितीबाबत पंतप्रधानांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा; केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन


मुंबई आणि परिसरातल्या मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. राज्याच्या काही भागात, मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

मुंबई आणि परिसरातल्या मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या परिस्थितीबाबत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

राज्याच्या काही भागात, मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी, महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केंद्राने दिले आहे.

मुंबई आणि परिसरातल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर, जनतेने आवश्यक ती खबरदारी घेऊन सुरक्षित राहावे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

BG/NC