Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मेक्सिकोच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली

मेक्सिकोच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली


मेक्सिकोच्या पररराष्ट्र मंत्री क्लॉडीया रुईज-मैसियू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या दोन दिवसांच्या द्विपक्षीय दौऱ्यासाठी भारतात आल्या आहेत.

या भेटीच्या वेळी पंतप्रधानांनी सप्टेंबर 2015 मध्ये न्यूयॉर्क येथे “यूएनजीए” परिषदेच्या वेळी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष नीटो यांच्या सोबत झालेल्या बैठकीचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी ऊर्जा, नवनिर्माण, शहरी आणि नागरी विकास पायाभूत सुविधा विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अवकाश, कृषी, आरोगय आणि पारंपरिक औषध या क्षेत्रांसह अनेक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यावर विशेष भर दिला.

मेक्सिकोच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये भारता सोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यात स्वारस्य दर्शवले. त्यांनी मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना मेक्सिको भेटीचे निमंत्रण दिले.

J.Patnakar/S.Tupe/M.Desai