पीएम्इंडिया
जपान आणि भारतातून मोठ्या संख्येने उपस्थित व्यापारी प्रतिनिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी, केडाइनडरन, जेट्रो, निक्की, सी आय आय आणि नासकॉमचे वरिष्ठ अधिकारी,जपानमध्ये येऊन इथल्या व्यापारी समुदायाशी संवाद साधताना मला नेहमीच आनंद होतो. मला आठवत आहे सुमारे, 10 वर्षांपासून माझी इथल्या उद्योगपतींशी विस्ताराने चर्चा होत आहे. मी आपला दृष्टिकोन जाणून घेतला, अनेक नव्या नव्या गोष्टी मी आपणाकडून शिकलो. गेल्या दशकात, भारताप्रती, आपली आत्मीयता काळाबरोबरच सदैव वाढत आहे.
देशात, इझ ऑफ डूइंग बिझनेस अर्थात व्यापार करण्यासाठीचे वातावरण आणि जीवन सुलभ आणि सुकर झाल्याचे प्रत्येक पावलावर जाणवावे असा सरकारचा प्रयत्न आहे.
मित्रहो,
काही वर्षांपूर्वी, मी भारतात,मिनी जपान तयार करण्याबाबत बोललो होतो.याबाबत आपण व्यापक स्तरावर भारतात काम करत आहात ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.
काही दशकांपासून भारतात,1150 जपानी कंपन्या भारतात होत्या तर आता 2014 ते 2017 या काळात जपानच्या 200 पेक्षा जास्त नव्या कंपन्यांनी भारतात आपले कामकाज सुरू केले.दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. यासाठी आपण अभिनंदनाला पात्र आहात.
आज जपानच्या कंपन्या, भारतात वाहन उत्पादनापासून ते दळण वळण,पायाभूत क्षेत्र ते सेवा क्षेत्रापर्यंत सहकार्याने काम करत आहेत.भारत आणि जपान यांच्यातला हा सुखद प्रवास अधिक आनंददायी आणि प्रभावी व्हावा यासाठी आपणा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा.
मित्रहो,
भारत आणि जपान यांची सहअस्तित्वाची भावना,विश्वास आणि आपल्या आत्मीयतेवर आधारित आहे.याचमुळे 2014 मध्ये पंतप्रधान या नात्याने केलेल्या पहिल्या जपान दौऱ्या दरम्यान,उभय देशातल्या संबंधांना नवा आयाम देऊन, त्यांना नव्या उंचीवर नेऊन, विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी स्तरापर्यंत नेण्याचा निश्चय दोन्ही देशांनी केला. त्यानंतर मी आणि जपानचे पंतप्रधान आबे यांची भेट अनेकवेळा झाली. पंतप्रधान आबे आणि मी, आम्ही दोघांनी मिळून, व्यापारात येणाऱ्या अनेक अडचणी दूर केल्या.
मित्रहो,
जपान सरकारने गेल्या काही वर्षात, आमच्या महत्वाकांक्षी अनेक प्रकल्पाना सहाय्य केले आहे. आमचा राष्ट्राला अर्पण केलेला पच्छिम मालवाहतूक कॉरिडॉर आता पूर्ण होणार आहे. एका वर्षाने, हा कॉरिडॉर पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी तयार होईल.याच्याशी जोडला गेलेला आमचा दिल्ली- मुंबई औद्योगिक कॉरिडॉर हा प्रकल्प आहे, तो ही जपान सरकार आणि जपान मधल्या कंपन्याच्या सहकार्याने आगेकूच करत आहे.
आबे यांच्या मागील भेटी वेळी निर्धारित केलेल्या हाय स्पीड रेल्वे प्रकल्पावर काम करण्याचे आम्ही निश्चित केले आहे. भारतातला पहिला प्रकल्प मुंबई- अहमदाबाद दरम्यान सुरू झाला आहे आणि यावरही वेगाने काम सुरू आहे.
मित्रहो,
भारतात आमचे सरकार येऊन साधारणतः साडेचार वर्षे झाली आहेत. या दरम्यान व्यापाराशी संबंधित प्राधान्य क्रमात मी अग्रस्थान दिले आहे ते इझ ऑफ डूईंग बिझनेसला. याचा परिणाम आपल्यासमोर आहे. 2014 मध्ये मी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी जागतिक बँकेच्या ‘इझ ऑफ डूईंग बिझनेस’मध्ये भारताचे स्थान 142 वे होते. आता भारत शंभराव्या स्थानावर आहे आणि यात आणखी सुधारणा करण्यासाठी व्यापक स्तरावर काम करत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन स्तरावर आम्ही एका पाठोपाठ एक पाऊले उचलत आहोत. येत्या काळात याचे अधिक चांगले परिणाम आपल्याला मिळतील. त्वरित आणि निर्णायक निर्णय त्याच बरोबर अनावश्यक नियमात केलेले फेरबदक यामुळे इतकी मोठी सुधारणा शक्य झाली. मी आपल्याला आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट सांगू
इच्छितो. व्यापार करण्यासाठी सुलभ आणि पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी म्हणजे ‘इझ ऑफ डूईंग बिझनेसला’ आणखी प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्र सरकारने, आपली 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मानांकन देणे सुरू केले आहे.
याचा मोठा परिणाम म्हणजे आता राज्यातही गुंतवणुकीबाबत निकोप स्पर्धा सुरू झाली आहे, ज्याचा सुखद परिणाम दिसू लागला आहे.
मित्रहो,
गुंतवणूक ही आपल्या देशाची गरज आहे. म्हणून ‘इझ ऑफ डूईंग बिझनेस’ मध्ये आम्ही ठोस पावले उचलत आहोत. गुंतवणूक होईल तेव्हा रोजगाराच्या नच्या संधी उपलब्ध होतील,देशाच्या पायाभूत क्षेत्रात सुधारणा होईल, कृषी, खनिज, सागरी संपत्ती आणि इतर नैसर्गिक संपत्तीत मूल्यवर्धन होईल.
आपल्या नागरिकांना, सुलभ जीवनमान देण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे म्हणजे इझ ऑफ डूईंग बिझनेसचा विस्तार आहे.
म्हणूनच एक महा अभियान चालवून आम्ही इझ ऑफ डूईंग बिझनेस क्षेत्रात काम केले आहे. यादरम्यान आमची अन्य कामगिरी अशी आहे. जागतिक बौद्धिक संपदा संस्था (डब्लूआयपीओ) च्या जागतिक कल्पकता निर्देश सूचित भारत 21 स्थाने वर आला आहे.
जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक स्पर्धात्मकता सूचीमध्ये दोन वर्षात आपण 31 स्थानांनी वर सरकत प्रगती केली आहे.
यूएनसीटीएडी ने केलेल्या सूचिमध्ये 10 थेट परकीय गुंतवणूक स्थानात भारताचे भक्कमपणे नाव आहे.
गेल्या काही वर्षात थेट परकीय गुंतवणुक क्षेत्रात आम्ही अनेक सुधारणा केल्या आहेत. थेट परकीय गुंतवणुकीच्या दृष्टीने, आपण सर्वात खुली अर्थव्यवस्था बनलो आहोत. 90 टक्क्यांपेक्षा जास्त परवानग्या आता ऑटोमॅटिक अर्थात आपोआप दिल्या जातात.
याचा परिणाम म्हणजे आपली थेट परकीय गुंतवणूक गेल्या तीन वर्षात 36 अब्ज अमेरिकी डॉलर्स वरून 60 अब्ज अमेरिकी डॉलर्स वर पोहोचली आहे.
सद्य स्थितीत जगातली सर्वात वेगाने विकास होणारी मोठी अर्थ व्यवस्था म्हणून आपण ओळखल्या जातो. आता आपण 2.59 ट्रिलियन अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याबरोबरच सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत आणि लवकरच पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने मार्गस्थ आहोत.
देशांतर्गत स्तरावर आम्ही जी कटीबद्धता दर्शवत सुधारणा केल्या आहेत, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था,
अनौपचारिक वरून औपचारिक अर्थव्यवस्था बनत आहे.
व्यवहार आता कागदोपत्री नव्हे तर ऑनलाईन होऊ लागले असल्याने पारदर्शकता वाढली आहे.
देशभरात वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आल्यामुळे वाहतूक अधिक सुलभ झाली असून लॉजिस्टिक क्षेत्र अधिक मजबूत झाले आहे. काळानुरूप आम्ही कॉर्पोरेट कर कमी करत आहोत. सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राला याचा मोठा फायदा मिळावा याकडे विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे.
धोरणात स्थैर्य आणि पारदर्शकता आणण्याची व्यापारी वर्गाची मागणी आता भारत सरकारची ओळख ठरली आहे.
मित्रहो,
पंतप्रधान या नात्याने माझ्या पहिल्या दौऱ्यादरम्यान जपान प्लस नावाची एक संस्था उभारण्याविषयी बोललो होतो.जेट्रो आणि आपण सर्वांनी या व्यवस्थेचा उपयोग केला आहे याचा मला आनंद आहे.
या निमित्त मी आणखी एक माहिती आपल्याला देऊ इच्छितो.जपान प्लस आपल्या इन्व्हेस्ट इंडिया समवेत काम करते.इन्व्हेस्ट इंडिया ला काही दिवसांपूर्वी उत्तम कार्याबद्दक संयुक्त राष्ट्रांनी जागतिक सन्मान देऊन गौरविण्यात आले.
मित्रहो,
भारतात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था,वेगाने विकसित होणारा मध्यम वर्ग,वेगाने वाढणारी शहरी लोकसंख्या,युवा लोकसंख्या,जपान च्या कंपन्यांना कामासाठी व्यापक संधी प्रदान करत आहेत.
मी काही उदाहरण देऊ इच्छितो.
भारतात गेल्या चार वर्षात ,मेक इन इंडिया सारख्या विशिष्ट कार्यक्रमा अंतर्गत भारताला,उत्पादन आणि संशोधन क्षेत्रात जागतिक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने आगेकूच करत आहोत.
भारतात खासकरून जपानच्या सूक्ष्म,लघु आणि मध्यम कंपन्यांना काम करण्याची संधी आहे. भारतात येणाऱ्या सर्व मोठ्या कंपन्यांचे स्वागत आहेच त्याचबरोबर सूक्ष्म,लघु आणि मध्यम उदयोगामार्फतही जपानी व्यापार प्रतिनिधी आपला व्यवसाय नव्या उंचीवर नेऊ शकतात. सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगामुळे त्याचा प्रभाव कमी काळात दिसू लागतो.
भारतात व्यापार करण्याचा एक फायदा म्हणजे कमी उत्पादन खर्च हा आहे.त्याच्या मागे भारतात स्पर्धात्मक कामगार खर्च ही मोठी ताकद आहे. त्याच बरोबर आमचा माहिती तंत्रज्ञान उद्योग हे मोठी ताकद आहे. मी याआधीही म्हटले आहे की आमच्याकडचे सॉफ्टवेअर आणि जपानचे हार्डवेअर एकत्र आल्यास जगात चमत्कार करू शकतात.
एव्हढेच नव्हे तर तंत्रज्ञान क्षेत्रात घडणाऱ्या नव्या बाबी,कृत्रिम बुद्धिमत्ता,इंटरनेट ऑफ थिंग, 3 डी प्रिंटिंग, रोबोटिक्स मार्फत आमचे उदयोग, 4.0 च्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहेत.
याचप्रमाणे, इलेक्ट्रिक मोबिलिटी हे असे क्षेत्र आहे ज्यात भारत आणि जपान यांच्यातले सहकार्य दोन्ही देशांना अतिशय लाभदायी ठरणार आहे.
मित्रहो,
याशिवाय भारतात आम्ही,पायाभूत क्षेत्रावरही अभूतपूर्व काम करत आहोत.नेक्स्ट जनरेशन अर्थात आधुनिक पायाभूत सुविधांवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. कौशल्य,गती यावर आधारित स्पर्धात्मक अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा आमचा निश्चय आहे. ती साकार करण्यासाठी, गुंतवणूक वातावरण सुधारण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.
आज या मंचावरून, आपण सर्वाना, भारतात निर्माण होतात असलेल्या विशाल व्यावसायिक संधींची मी आमंत्रित करतो. या संधी संदर्भात मी आणखी काही उदाहरणे आपल्याला देऊ इच्छितो.
आमचा सागरमाला कार्यक्रम, ज्यामार्फत आम्ही किनारी प्रादेशिक भाग जोडू इच्छितो, आपल्यासाठी ही मोठी संधी आहे. स्मार्ट सिटी कार्यक्रमाअंतर्गतही, अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत. आमच्या 50 शहरात मेट्रो रेल्वे सुरू करू इच्छितो.
याच प्रकारे,आमचा रेल्वे आणि रस्ते विस्तार आणि आधुनिकीकरण कार्यक्रमही विशाल आहे. आता आम्हाला हाय स्पीड कॉरिडॉरही निर्माण करायचे आहेत. बंदरे आणि विमानतळ आधुनिकीकरणाबरोबरच नवी बंदरे आणि विमानतळ निर्मितीही विचाराधीन आहे. अंतर्गत जल वाहतूक आणि हरित उर्जेप्रति आमची कटीबद्धता आहे आणि आपल्यासाठी ही मोठी संधी आहे.
पोलादाच्या वापर सध्या आमच्याकडे कमी आहे.त्याचबरोबर लोखंड खाणी पुरेश्या आहेत. उच्च दर्जाचे स्टील उत्पादन भारतात व्हावे अशी माझी इच्छा आहे.
मित्रहो,
भारत आणि जपान दोन्ही राष्ट्रे, लोकशाही आणि स्वातंत्र्याचे समर्थक आहेत.
त्याच बरोबर विकासासाठी सहयोगाप्रति दृष्टिकोन आणि धोरण यात समानता आहे.
पायाभूत आणि क्षमता उभारणी याशिवाय, आरोग्य आणि कृषी यासारख्या क्षेत्रात, जपान आणि भारत यांच्यात तिसऱ्या देशात सहयोगासाठी प्रबळ शक्यता आहे.
म्हणूनच इंडो-पॅसिफिक असो,दक्षिण आशिया,आफ्रिका असो भारत आणि जपान आपल्या भागीदार देशाच्या प्राधान्यानुसार तिसऱ्या देशातल्या विकासासाठी आपली भागीदारी अधिक मजबूत करतील.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी मध्ये जपानच्या प्रवेशामुळे,सौर ऊर्जा आणि हवामान बदल यासारख्या विषयांवर आपल्या दोन देशादरम्यान तिसऱ्या देशात भागीदारीसाठी नवे दालन खुले झाले आहे.
आज भारत जपान व्यापारी प्रतिनिधी मंच बैठकीत अनेक सदस्यांनी आफ्रिकेत, भारत आणि जपानच्या व्यावसायिकात या क्षेत्रात सहयोग वाढवण्यासाठी उत्तम विचार मांडले याचा मला आनंद आहे.
मित्रहो,
मी नेहमीच मजबूत भारत-मजबूत जपान बाबत बोलत असतो,
भारतावर विशेष विश्वास व्यक्त केल्याबद्दल जपानच्या उद्योग वर्गाचे, मी आभार मानतो.
भारतात गुंतवणुकीची गती वाढवण्यासाठी मी आपण सर्वाना आमंत्रित करतो. जपान आणि भारत यांच्यात व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आपली सर्वतोपरी मदत केली जाईल.
या आयोजनासाठी आपणा सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद !
*******
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
भारत सरकार ने Ease of Doing business को और बढ़ावा देने के लिए अपने 36 राज्यों और Union Territories की Ranking भी करनी शुरू कर दी है।
— PMO India (@PMOIndia) October 29, 2018
इसका एक बड़ा प्रभाव ये हुआ है कि अब राज्यों में भी Investment को लेकर Healthy Competition शुरू हो गया है जिसके बहुत बेहतर परिणाम दिखने लगे हैं: PM
प्रधानमंत्री के तौर पर अपनी पहली यात्रा के दौरान ही मैंने Japan plus नाम की एक संस्था खड़ी करने की बात की थी।
— PMO India (@PMOIndia) October 29, 2018
Japan plus हमारी Invest India के साथ मिलकर काम करती है।
इस @investindia को अपने बेहतरीन कार्यों के लिए युनाइटेड नेशंस ने वैश्विक सम्मान से पुरस्कृत किया है: PM
भारत में व्यापार करने का एक फायदा Low cost manufacturing भी है। उसके पीछे भारत में Competitive Labour Cost एक बहुत बड़ी ताकत है।
— PMO India (@PMOIndia) October 29, 2018
उसी तरह से हमारी IT industry एक बहुत बड़ी शक्ति है। मैंने पहले भी यहां आकर कहा है, हमारा Software और आपका Hardware मिल जाए, तो कमाल हो सकता है: PM
भारत technology के क्षेत्र में होने वाले नए आविष्कारों जैसे AI, IoT, 3D Printing, Robotics आदि के जरिए Industry 4.0 की तरफ तेजी से आगे बढ़ रहा है।
— PMO India (@PMOIndia) October 29, 2018
Electric Mobility एक ऐसा क्षेत्र है जिसमें भारत और जापान के बीच का सहयोग दोनों देशों के लिए बेहद लाभदायक साबित होने जा रहा है: PM
मैं हमेशा ही Strong India – Strong Japan की बात करता रहा हूं।
— PMO India (@PMOIndia) October 29, 2018
मैं आज इस अवसर पर जापान के उद्यमी वर्ग का भारत पर विशेष विश्वास करने के लिए आभार व्यक्त करता हूं।
मैं आप सभी को भारत में निवेश की गति बढ़ाने के लिए भी आमंत्रित करना चाहूंगा: PM