पीएम्इंडिया
1) ट्वीन स्टार (स्टरलाईट ही भागधारक कंपनी) आणि तैवानच्या AUTRON या तंत्रज्ञान भागीदारासोबत LCD FAB मध्ये गुंतवणूक करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळादरम्यान सामंजस्य करार भारतातील हा अश्या प्रकारचा पहिलाच प्रकल्प असेल. या प्रकल्पातील प्रस्तावित गुंतवणूक 20 हजार कोटी रुपयांची असेल.
2) विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी रस निर्मिती सुविधा उभारण्यासाठी मेसर्स कोका कोला बिव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड, जैन इरीगेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र सरकारचा कृषी आणि पणन विभाग यांच्यातला सामंजस्य करार. या प्रकल्पामुळे संत्रा उत्पादकांना अधिक किंमत मिळेल आणि उपयुक्त रोजगार निर्मिती होईल. सर्वसाधारपणे प्रत्येकी सरासरी 82 एकर जमीन असणाऱ्या 5 हजार शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होईल.
3) “शेतापासून वस्त्र निर्मिती पर्यंत” या उपक्रमाचा एक भाग म्हणून मेसर्स रेमंड इंडस्ट्रीज आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा दरम्यान सामंजस्य करार. सूत, कापड आणि वस्त्रनिर्मिती यासाठी चौदाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी रेमंड उत्सुक आहे. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव इथे हा प्रकल्प उभारण्यात येईल. या प्रकल्पासाठी विदर्भातील तसंच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण जास्त असणाऱ्या भागातून कापसाची खरेदी करण्यात येईल.
J. Patankar / S. Tupe / M. Desai