Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

युरिया आणि एलपीजी उत्पादकांना घरगुती गॅस पुरवण्यासाठी मार्केटिंग मार्जिन निश्चित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज युरिया आणि एलपीजी उत्पादकांना घरगुती गॅस पुरवण्यासाठी मार्केटिंग मार्जिन निश्चित करायला मंजुरी दिली.

हा निर्णय रचनात्मक सुधारणा आहे. गॅसच्या मूळ किंमतीवर गॅस विपणन कंपन्यांकडून ग्राहकांना आकारलेले शुल्क म्हणजे मार्केटिंग मार्जिन होय. सध्या विविध वाहतूकदार नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी वेगवेगळी मार्केटिंग मार्जिन आकारतात. या निर्णयामुळे युरिया आणि एलपीजी सारख्या नियंत्रित क्षेत्रासाठी घरगुती गॅस पुरवण्यावर लादण्यात येणाऱ्या मार्केटिंग मार्जिनमध्ये समानता येईल. या निर्णयामुळे युरिया आणि एलपीजी उत्पादकांकडून देण्यात येणाऱ्या मार्केटिंग मार्जिनमध्ये घट होईल.

तसेच भेदभाव विरहित आधारावर दर ठरवला जाईल. मार्केटिंग मार्जिनमधल्या तफावतीमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने लक्ष घातले आणि त्यांनी केलेल्या शिफारशींच्या आधारे आज मार्केटिंग मार्जिनला अंतिम स्वरुप देण्यात आले. मार्केटिंग मार्जिनमधील भविष्यातील वाढीचा निर्णय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय घेईल.

या निर्णयामुळे पारदर्शकता येईल आणि वायू संबंधित पायाभूत क्षेत्रातील भविष्यातील गुंतवणुकीला सकारात्मक चालना मिळेल.

S. Kane/S.Tupe/N.Sapre