Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा


नवी दिल्‍ली, 17 सप्‍टेंबर 2025

 

युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष महामहिम उर्सुला वॉन डेर लेयन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांनी पंतप्रधान मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले.

आज युरोपियन महासंघाने नवीन धोरणात्मक ईयू-इंडिया अजेंडा स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही शक्ती म्हणून, नेत्यांनी परस्पर समृद्धीसाठी तसेच जागतिक समस्यांना संयुक्तपणे तोंड देण्यासाठी, स्थिरतेला चालना देण्यासाठी आणि नियम-आधारित व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत- युरोपियन महासंघ धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांचे स्वागत केले.

वर्ष अखेरपर्यंत भारत-युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करार वाटाघाटी पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला. 

नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. युक्रेनमधील संघर्षाचे लवकर आणि शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे.

पंतप्रधान मोदींनी पुढील वर्षी भारतात होणाऱ्या भारत- युरोपियन महासंघ शिखर परिषदेसाठी पुन्हा आमंत्रण दिले. 

 

* * *

निलिमा चितळे/वासंती जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai