Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रांची येथील हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनच्या जमिनीचे झारखंड सरकारकडे हस्तांतरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


रांची येथील हेवी इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेडकडून( एचईसी) सध्या वापर होत नसलेल्या 675.43 एकर जमिनीचे झारखंड सरकारकडे हस्तांतरण करण्याला तसेच या जमिनीची विक्री करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे एचईसीला 742.98 कोटी रुपये उभारण्यास मदत मिळणार आहे आणि कर्मचाऱ्‍यांची ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी, रजा भरपाई निधी आणि निवृत्तीपश्चात इतर फायदे आदी देण्यासाठी निधी उपलब्ध होईल. तसेच सरकारकडे, बँकांकडे असलेली थकबाकी आणि इतर देणी चुकवण्यासाठी एचईसीला मदत मिळेल.

N.Sapre/S.Patil/Anagha