पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये अजमेर येथे राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीम आणि 17,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांच्या शुभारंभादरम्यान केलेल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केली.
X पोस्टच्या मालिकेत पंतप्रधान मोदी म्हणाले;
“आमचे सरकार सर्वांगीण विकासासाठी संकल्पबद्ध आहे. याच अनुषंगाने आज अजमेर येथून राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण अभियानाच्या प्रारंभासह अनेक प्रकल्पांचे उद्घाटन-पायाभरणी तसेच युवकांना नियुक्त पत्रांचे वितरण करण्याचे सौभाग्य लाभले.
हमारी सरकार सर्वांगीण विकास के लिए संकल्पबद्ध है। इसी कड़ी में आज अजमेर से राष्ट्रव्यापी एचपीवी टीकाकरण अभियान की शुरुआत के साथ कई परियोजनाओं के उद्घाटन-शिलान्यास और युवाओं को नियुक्ति पत्रों के वितरण का सौभाग्य मिला है। https://t.co/sEmzvIlWid
— Narendra Modi (@narendramodi) February 28, 2026
“भाजपाचे डबल इंजिन सरकार युवा शक्तीला सक्षम बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. अजमेरमध्ये आपल्या युवा मित्रांना नियुक्ती पत्रे प्रदान करून खूप आनंद झाला.”
भाजपा की डबल इंजन सरकार युवाशक्ति को सशक्त करने के लिए प्रतिबद्ध है। अजमेर में अपने युवा साथियों को नियुक्ति पत्र सौंपकर बहुत प्रसन्नता हुई है। pic.twitter.com/Mh3sGC4xhh
— Narendra Modi (@narendramodi) February 28, 2026
“अजमेरच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने आलेल्या राजस्थानच्या आपल्या कुटुंबीयांचा उत्साह सांगत आहे की डबल इंजिन सरकारच्या विविध विकास कामांमुळे ते किती उत्साहित आहेत.”
अजमेर के कार्यक्रम में भारी संख्या में आए राजस्थान के अपने परिवारजनों का जोश बताता है कि डबल इंजन सरकार के चौतरफा विकास कार्यों से वे कितने उत्साहित हैं। pic.twitter.com/CpQ3LnJmWM
— Narendra Modi (@narendramodi) February 28, 2026
“वीरांगनांची भूमी असलेल्या राजस्थानच्या अजमेर येथून देशभरातील मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करून खूप आनंद झाला. देशाच्या मातृशक्तीला निरोगी आणि सशक्त बनवण्याच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.”
वीरांगनाओं की धरती राजस्थान के अजमेर से देशभर की बेटियों के लिए HPV वैक्सीनेशन अभियान का शुभारंभ कर बहुत खुशी हुई है। देश की मातृशक्ति को स्वस्थ और सशक्त बनाने की दिशा में यह एक अहम कदम है। pic.twitter.com/z30IB01tgb
— Narendra Modi (@narendramodi) February 28, 2026
“काँग्रेसला संपूर्ण देशात पराभवाचा सामना करावा लागत आहे आणि रागाने तो पक्ष याचा बदला भारताला बदनाम करून घेत आहे. जागतिक एआय शिखर परिषदेत परदेशी पाहुण्यांसमोर भारताला अपमानित करण्याचा त्यांचा प्रयत्न हेच सांगतो.”
कांग्रेस पूरे देश में लगातार हार रही है और गुस्से में वो इसका बदला भारत को बदनाम करके ले रही है। Global AI Summit में विदेशी मेहमानों के सामने भारत को शर्मसार करने का उसका प्रयास भी यही बताता है। pic.twitter.com/VG5JhINPnl
— Narendra Modi (@narendramodi) February 28, 2026
“डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळे राजस्थानच्या आपल्या शेतकरी बंधू भगिनींना सिंचन प्रकल्पांचा मोठा लाभ होत आहे. यातून काँग्रेसचे कुशासन आणि भाजपाचे सुशासन यातील फरक स्पष्टपणे दिसून येत आहे.”
डबल इंजन सरकार के प्रयासों से राजस्थान के हमारे किसान भाई-बहनों को सिंचाई परियोजनाओं का बहुत लाभ हो रहा है। इससे कांग्रेस के कुशासन और भाजपा के सुशासन का फर्क साफ नजर आता है। pic.twitter.com/I121HrqFcb
— Narendra Modi (@narendramodi) February 28, 2026
“अजमेर येथून आज, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध राष्ट्रीय एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून अजमेर येथील मनीषा रावत या लसीकरण झालेल्या पहिल्या व्यक्ती ठरल्या. महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी हा एक प्रमुख उपक्रम आहे.”
From Ajmer today, the national HPV Vaccination Campaign Against Cervical Cancer has been launched. Manisha Rawat from Ajmer became the first person to be vaccinated as a part of this campaign. This is a major initiative to improve women’s health. pic.twitter.com/hkEdHIeMqX
— Narendra Modi (@narendramodi) February 28, 2026
“गर्भाशयमुखाच्या कर्करोगाविरुद्ध एचपीव्ही लसीकरण मोहिमेच्या प्रारंभानंतर, आज लसीकरण झालेल्या माझ्या युवा सहकाऱ्यांशी बोललो. आपल्या मुली आणि मातांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल आहे.”
After the launch of the HPV Vaccination Campaign Against Cervical Cancer, spoke with my young friends who have been vaccinated today. This is a decisive step towards protecting the health of our daughters and mothers. pic.twitter.com/HZ9T5mIyV5
— Narendra Modi (@narendramodi) February 28, 2026
* * *
माधुरी पांगे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai