Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा


 

नितीश कुमार यांनी आज राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

नितीश कुमार हे देशातील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक असून त्यांची सुशासनाप्रती असलेली वचनबद्धता आणि बिहारच्या विकासातील अविस्मरणीय योगदान सर्वमान्य आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. नितीश कुमार त्यांचे संसदेत पुनरागमन होत आहे हे पाहून आनंद झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. अनुभवी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री म्हणून त्यांचा व्यापक अनुभव सभागृहाची प्रतिष्ठा अधिक वाढवेल, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात लिहिले:

“नीतीश कुमारजी हे देशातील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. सुशासनाबाबतच्या त्यांच्या बांधिलकीची सर्वत्र प्रशंसा झाली आहे. बिहारच्या विकासात त्यांनी अमिट योगदान दिले आहे. त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाहणे अत्यंत आनंददायी आहे. खासदार  आणि केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे सेवा बजावली आहे. त्यांच्या दीर्घ राजकीय अनुभवामुळे संसदेची प्रतिष्ठा  अधिक वाढेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा.”

***

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai