Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राज्याचे ‘केरळ’ ऐवजी ‘केरलम’ असे नामांतर केल्याबद्दल प्रख्यात मल्याळी साहित्यिकांनी पंतप्रधानांचे मानले आभार


नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2026

 

प्रख्यात मल्याळी साहित्यिकांच्या एका प्रतिनिधीमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ‘केरळ’ राज्याचे ‘केरलम’ असे नामांतर केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पंतप्रधानांनी या प्रख्यात मल्याळी साहित्यिकांचे स्वागत करताना त्यांना भेटून अत्यंत आनंद झाल्याचे सांगितले. ही संवादपर भेट अत्यंत अंतर्दृष्टीपूर्ण ठरल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या भेटीतून साहित्यिकांची ‘केरलम’ आणि मल्याळम भाषेबद्दलची उत्कट बांधिलकी अधोरेखित झाल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिले:

“‘केरळ’चे ‘केरलम’ असे नामांतर केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी आलेल्या प्रख्यात मल्याळी साहित्यिकांच्या समूहाचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद झाला.

हा संवाद अत्यंत अंतर्दृष्टीपूर्ण होता आणि ‘केरळम्’ व मल्याळम भाषेबद्दल त्यांची उत्कट बांधिलकी यातून स्पष्ट झाली.”

 

* * *

निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai