Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राष्ट्रीय विकास आणि जागतिक कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा पंतप्रधानांचा निर्धार


नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2026

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपण संशोधन, नवोन्मेष आणि वैज्ञानिक कुतूहलाचा उत्सव साजरा करतो, जो आपल्या देशाला पुढे नेत राहतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, “हा दिवस सर सी.व्ही. रमण यांनी लावलेल्या ‘रमण इफेक्ट’ या क्रांतिकारी शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.” या शोधामुळे भारतीय संशोधनाला जागतिक नकाशावर भक्कम स्थान मिळाले, असेही पंतप्रधान म्हणाले.

आपल्या तरुणांना सक्षम बनवण्याचा, संशोधन परिसंस्था अधिक बळकट करण्याचा आणि राष्ट्र विकास तसेच जागतिक कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आपल्या निर्धाराचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;

आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त, आपण संशोधन, नवोन्मेष आणि वैज्ञानिक कुतूहलाचा गौरव करतो, जो आपल्या देशाला पुढे नेतो.

हा दिवस सर सी.व्ही. रमण यांच्या ‘रमण इफेक्ट’ या क्रांतिकारी शोधाच्या स्मृती जपण्यासाठी साजरा केला जातो. या शोधामुळे भारतीय संशोधनाला जागतिक स्तरावर भक्कम स्थान मिळाले आहे.

आपल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी, संशोधन परिसंस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकास आणि जागतिक कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी आम्ही आमच्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो.

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai