Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक 2019 मधील सुधारणांना मंत्रिमंडळाची मंजुरी


तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक 2019 मधील सुधारणांबाबत अवगत करण्यात आले आहे. मूळ विधेयक मंत्रिमंडळाने 17 जुलै 2019 ला मंजूर केले होते. ते संसदेच्या दोन्ही सभागृहात अनुक्रमे 29 जुलै 2019 आणि 1 ऑगस्ट 2019 रोजी अधिकृत सुधारणांसह मंजूर झाले होते.

विधेयकात पुढील सुधारणा करण्यात आल्या आहेत.

उपकलम 4 (1)(क)- 14 सदस्यांऐवजी 22 अर्धवेळ सदस्य

उपकलम 4 (4)(ब)- सहा सदस्यांऐवजी 10 सदस्य

उपकलम 4 (4)(क)- पाच सदस्यांऐवजी 9 सदस्य

उपकलम 37 (2)- शेवटी घालण्यात आले आहे ”अध्ययनाच्या उद्देशासाठी सुद्धा”.

*******

B.Gokhale/S.Kakade/D.Rane