Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण अधिनियम 1993 मधे सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण अधिनियम 1993 मधे सुधारणा करणारे विधेयक संसदेत मांडण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. एन सी टी ई च्या परवानगीवाचून अध्यापक शिक्षण अभ्यासक्रम चालवणाऱ्या केंद्र, राज्य आणि विद्यापीठांना पूर्वलक्षी मान्यता देण्याचा या सुधारणा कायद्यामागचा उद्देश आहे.

केंद्र, राज्य आणि केंद्र शासित अनुदानित, संस्था आणि विद्यापीठांनी एन सी टी ई च्या मान्यते वाचून, 2017 – 2018 या शैक्षणिक वर्षापर्यंत चालवलेल्या अध्यापक शिक्षण अभ्यासक्रमाला पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्याची तरतूद या सुधारणेत आहे. या संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागू नये या हेतूने एकदाच ही उपाय योजना करण्यात आली आहे. यामुळे अशा संस्थांमध्ये शिकणारे किंवा याआधी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, शिक्षक म्हणून काम करण्यासाठी पात्र ठरतील.

अध्यापकांसाठीचे शिक्षण देणाऱ्या बी एड, डी एड सारखे अभ्यासक्रम चालवण्यासाठी नॅशनल कौंसिल फॉर टीचर एज्युकेशनची, एन सी टी ई कायद्याच्या कलम 14 अंतर्गत मान्यता घ्यावी लागणार आहे. याशिवाय अशा मान्यता प्राप्त संस्थांना , एन सी टी ई अधिनियमाच्या कलम 15 अंतर्गत अभ्यासक्रमासाठी परवानगी प्राप्त करावी लागणार आहे.

N.Sapre/N.Chitale/P.Kor