Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लोकपाल आणि लोकायुक्त (सुधारित) विधेयक, 2016


पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने, लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, 2013 च्या आनुषंगिक सुधारणांना आणि कलम 44 च्या सुधारणांना तत्वत: मंजूरी देऊन संसदेत लोकपाल आणि लोकायुक्त (सुधारणा) विधेयक, 2016 सादर केले.

लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, 2013च्या कलम 44 च्या तरतूदींची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी आणि विविध श्रेणीच्या सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली चिंता आणि धास्ती लक्षात घेता या सुधारणांना मान्यता देण्यात आली.

B.Gokhale/S.Mhatre/AK