पीएम्इंडिया
वन्यजीव संरक्षणाबाबत सहकार्य वाढविण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. यामुळे वन्यजीव संरक्षण आणि वन्यजीव विभागाचे व्यवस्थापन यासंदर्भात भारताला अमेरिकी संस्थांच्या तज्ञांचा सल्ला मिळणार आहे. वन्यजीव आणि त्यांच्या अवयवांच्या अवैध तस्करीला आळा घालण्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे.
N.Chitale/B.Gokhale